शौर्य, शिस्त आणि कलेचा आविष्कार असलेले संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कोपरगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे दर्शन घडवणाऱ्या या कार्यक्रमात शैक्षणिक गुणवत्ता, शिस्तबद्ध सादरीकरण आणि कलात्मक अभिव्यक्ती यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला.
या स्नेहसंमेलनासाठी सम्राट वर्मा ग्रुपचे अध्यक्ष मा. श्री. सम्राट वर्मा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी संजीवनी अकॅडमी वैजापूर च्या मॅनेजिंग डायरेक्टर सौ निकिता कोल्हे, नॉन अकॅडमीक डायरेक्टर श्री. सांगळे सर, एस.जि.ओ श्री असिफ सर, शाळेचे प्राचार्य श्री. के. एल. दरेकर, कॅम्पस अॅडमिन श्री. विजय भास्कर, संगीत शिक्षक श्री. महेश गुरव सर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, हॉस्टेल स्टाफ यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या शालेय बँड पथकातील विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह गौरव करण्यात आला, तसेच शाळेच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवणाऱ्या सर्व खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील शौर्य, शिस्त, कला आणि कर्तृत्व या गुणांचा गौरव करण्यात आला. संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केवळ शिक्षण नव्हे तर संस्कार, देशप्रेम आणि नेतृत्वगुण घडवण्याचे कार्य सातत्याने करत असल्याचे आणि या सर्वांसाठी व्यवस्थापनाचे आभारी असल्याबद्दल पालकांनी मांडलेले मत ही अध्यक्ष माननीय श्री नितीनदादा कोल्हे व कार्यकारी विश्वस्त श्री अमितदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले श्रम नियोजन व प्रगती योग्य दिशेने सुरू असल्याची पावती होती.